
गोरेगाव –दरवर्षी एक ते सात सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणुन साजरा केला जातो. किसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल शाळेत राष्ट्रीय पोषण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना आहाराचे महत्त्व सांगितले. आपल्या शरीरामध्ये उर्जा निर्मिती करण्यासाठी आहारामध्ये पोस्टीक आणि सात्विक जेवण घ्यायला हवे तसेच फळाचे सेवन करावे अशी माहिती दिली.
वेगवेगळ्या वर्गासाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी जेवणाच्या डब्यात फळे, सलाद, अंकुरित कडधान्य असे पोषणयुक्त आहार आणले होते. तसेच पी प्रायमरी च्या लहान मुला -मुलींनी फळ आणि भाज्यांचे वेशभूसा धारण करून नृत्य सादर केले. अशाप्रकारे राष्ट्रीय पोषण आहार दिवस साजरा करण्यात आला.