Home शैक्षणिक रंगपंचमीच्या दिवशी येणारा 12 वी पेपर दुसर्‍या दिवशी घ्या : मनविसे

रंगपंचमीच्या दिवशी येणारा 12 वी पेपर दुसर्‍या दिवशी घ्या : मनविसे

0

मनविसेचे मोहन कोल्हे यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

वाशिम : राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यावर्षी होणार्‍या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, बारावीचा पेपर हा रंगपंचमीच्या दिवशी येत असल्याने या दिवशी होणारा पेपर दुसर्‍या दिवशी घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मोहन कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, रंंगपंचमीच्या दिवशी पेपर असल्याने पेपर देण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थींनी ह्या पेपर देण्यासाठी पायी पायी किंवा सायकलने येत असतात. अशा परिस्थीती हा पेपर घेणे म्हणजे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी होणारा पेपर दुसर्‍या दिवशी घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे वाशीम शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले मनविसे तालुकाध्यक्ष यश चव्हाण, मनविसे युवा नेतृत्व मोहन कोल्हे, संतोष धोटे, ऋतिक जाधव, गणेश हिवराळे, सुहास जाधव, विनायक गायवळ, यांच्यासह विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version