
गोरेगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी यशस्वीरीत्या संपन्न
गोरेगाव,दि.14: येथील पी.डी.रहांगडाले विद्यालय,गोरेगाव येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन 9 व 10 जानेवारीला करण्यात आले होते.विजेत्या विद्यार्थ्यांना 10 जानेवारीला बक्षीस वितरण करण्यात आले.तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव(बु.)च्या सहा.शिक्षिका सौ.भारती कटरे यांनी माध्यमिक शिक्षक गटात तर प्रयोगशाळा गटात के.बी.पारधी यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीकरीता निवड झाली आहे.
विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन पंकज रहांगडाले (अध्यक्ष जि. प. गोंदिया) यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले.दीपप्रज्वलन उपसभापती राजकुमार यादव यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तालुक्यातील डॉ टि. पी. येडे (अध्यक्ष ग्रामहीता शिक्षण संस्था गोरेगाव),यु. टी. बिसेन (संचालक ग्रामहीता शिक्षण संस्था गोरेगाव), माजी प्राचार्य पी.एफ.बघेले, एन. जे. सिरसाटे (गटशिक्षणाधिकारी पं स गोरेगाव), प्राचार्य वाय. आर. चौधरी,जिल्हा परिषद सदस्य डाॅ.लक्ष्मण भगत,विश्वजित डोंगरे व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना नवनवीन अभिनव कल्पना वैज्ञानिक प्रयोगांतून सादर करण्याचे आवाहन केले.
विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे ,गटवविकास अधिकारी अजितसिंह पवार ,गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे, प्राचार्य मा. वाय.आर. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध केंद्रातील केंद्रप्रमुख तसेच गट साधन केंद्र गोरेगाव चे कर्मचारी उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागात वर्ग 6 ते 8 च्या विद्यार्थ्यांचे एकूण 38 मॉडेल,माध्यमिक विभागात वर्ग 9 ते 12 चे एकूण 18 मॉडेल, शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक गटात 3 मॉडेल असे एकूण 59 मॉडेल सादर करण्यात आले. सदर प्रतिकृतींचे मूल्यमापन जगत महाविद्यालय,गोरेगावचे व्याख्याता डाॅ.प्रा.एम.बी.राय,कुर्हाडी येथील विज्ञान महाविद्यालयाच्या कु. ई.जे.गौतम व जी.के.कटरे यांनी केले.
सदर प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात प्रथम-कु. स्नेहल लेखेंद्रकुमार बोपचे,वर्ग 6 वा किरसान मिशन स्कूल गोरेगाव,द्वितीय-लक्की संदिप समोने वर्ग 8 वा , सरस्वती माध्यमिक विद्यालय घोटी व तृतीय- गुंजन मुकेश कावळे ,वर्ग 7 वा जि. प. व. प्रा. शाळा मोहाडी याने पटकावला. माध्यमिक गटात प्रथम दिपक रविंद्र भैसारे ,वर्ग 12 वा , श. जा. ति. जि. प. हायस्कूल गोरेगाव,द्वितीय- गगन प्रितम गणवीर ,वर्ग- 9 वा जीईएस हाय. कुर्हाडी व तृतीय- कु. प्राची व्यंकट रहांगडाले वर्ग 9 वा पी. डी. रहांगडाले विद्यालय, गोरेगाव हिने पटकावला. तर प्राथमिक शिक्षक गटात प्रथम- सी.एस. बागडकर जि. प. व. प्रा. शाळा बबई,माध्यमिक शिक्षक गटात प्रथम– सौ.भारती के. कटरे (परशुराम विद्यालय मोहगाव बु.) व प्रयोगशाळा सहाय्यक गटात के. बी. पारधी (परशुराम विद्यालय मोहगाव बु.) यांनी पारितोषिक पटकावले. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र,शब्दकोश व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ए.एच.कटरे (स.शी)यांनी तर प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे यांनी केले.विषय साधन व्यक्ती भास्कर बाहेकर यांनी सर्व उपस्थितांचे व आयोजक शाळेचे आभार मानले. या दोन दिवसीय आयोजनात प्रामुख्याने पी. डी. रहांगडाले विद्यालय गोरेगाव चे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच गट साधन केंद्र गोरेगाव चे सर्व विषयसाधनव्यक्ती व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.