Home शैक्षणिक जीएमसीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला “बेटी बचाव”चा संदेश

जीएमसीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला “बेटी बचाव”चा संदेश

0

प्रजासत्ताक दिनी सादरीकरण उपस्थितांची उत्स्फूर्त दाद

         गोंदिया,दि.27 : पोलीस कवायत मैदान कारंजा गोंदिया येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदियाच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे “बेटी बचाओ बेटी पढाओ -स्त्री भृण हत्या विरोधी” जनजागृतीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या पथनाट्याला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी दिलेला संदेश मोलाचा असून सामाजिक विषयाला वाचा फोडली अशी प्रतिक्रिया पाहुण्यांनी दिली.

         26 जानेवारी, 2023 रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पोलिस मुख्यालय, गोंदिया येथे मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदियाच्या प्रथम वर्ष एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य.

         स्त्री भ्रुणहत्या विरोधी जनजागरण तथा बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेवर आधारीत या पथनाट्याने उपस्थितांना अतिशय प्रभावित केले. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक कार्या बरोबर सामाजिक दायित्व म्हणून समाज प्रबोधन करण्याची संकल्पना अधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे यांची होती.  सदर पथनाट्याचे सादरीकरण व संचालनासाठी डॉ. विपूल अंबाडे, डॉ. प्रविण जाधव, डॉ. संजय चव्हाण, डॉ. गिरीष अंबादे, डॉ. संजय माहुले व डॉ. शिल्पा पटेरीया यांचे मागदर्शन लाभले.

          पोलिस विभागाचे आर.पी.आय. श्री. चाकाटे व पोलीस उपनिरिक्षक श्री. मिलींद बिरारे यांचे सुध्दा या पथनाट्याच्या संचालनास सहकार्य लाभले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदियाच्या सुमेत जांभुळकर, आर्यन कानतोडे , जयंत गाडगे, रिध्दी सोमवंशी, अथ्नवता भटाडे, विभांशू सोमकुंवर, सलोनी तागडे, श्वेता बेरड, गुलाम, सरवर, नेहल शरणागत, यश यायदे, भाग्यश्री रेपे, अर्जुन राठोड, शुभम नागरगोजे, प्रणोती अलासपुरे, लिपाक्षी कुंभुलवार, अथर्व डहाके, रफिक हसन या सर्व प्रथम वर्ष एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांनी या पथनाट्यात अभिनय केला.  विद्यार्थ्यांच्या या पथनाट्याचे सार्वत्रिक कौतूक होत आहे.

Exit mobile version