ओलंपियाड परीक्षेत ” एक्यूट पब्लिक शाळेचे सुयश

0
21

गोंदिया,दि.15- एस.ओ.एफ. ओलंपियाड परिक्षा गणित, विज्ञान, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयासाठी जागतिक स्तरावर वैज्ञानिक निर्माण करण्याकरिता प्रत्येक वर्षी शालेयस्तर व जिल्हास्तरावर आयोजित केला जाते.शैक्षणिक सत्र २०२२-२०२३ ला विद्याथ्र्यामधून शास्त्रज्ञांचा व प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्याकारिता गोंदिया जिल्हा स्तरावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.याच एक्यूट पब्लिक स्कूल गोंदिया येथील कृतिषा बागड़े वर्ग २ री हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर 2  रा रँक घेऊन रजत पदक मिळविले.वंश ढबाले वर्ग २ री आणि चार्वी चौधरी वर्ग २ री यांनी महाराष्ट्र झोनमध्ये स्वर्ण पदक पटकावले.प्रत्युष बागड़कर वर्ग ४ थी, हर्ष बुराडे ५ वी, नैतिक थानथराटे ६ वी, संकल्पना कोहड़े ७ वी, माही बनोटे ७ वी, अहम रामटेके ७ वी, शरद तुरकर ७ वी, रिद्धि पटले ५ वी, सुमिति हरिंणखेड़े ५ वी आणि हिमांशी तावाड़े ५ वी हे विद्यार्थी प्रविण्य श्रेणित उत्तीर्ण झाले.त्यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सचिव संजय भास्कर,सह सचिव श्रीमती एस.शुभा,मुख्याध्यापिक, शिक्षक, शिक्षिका व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि पालकगण उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आई वडील,शाळेच्या सर्व शिक्षकांना दिले