गोंदिया, दि.17 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्था कडून जेईई, नीट, एमएचटी-सीईटी-2025 या परिक्षेच्या पुर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्डमध्ये उपलब्ध अप्लिकेशन ट्रेनिंग या मोडवर ऑनलाईन पध्दतीने दिनांक 15 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. तथापि, आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करता महाज्योतीने आता जेईई, नीट, एमएचटी-सीईटी -2025 पुर्व प्रशिक्षणासाठी नव्याने अर्ज करण्याकरीता तसेच 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश केल्याबाबत व इतर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता विद्यार्थ्यांना दिनांक 30 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. टपालाव्दारे, प्रत्यक्ष किंवा ई-मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
युजीसी-नेट, सीएसआयआर-नेट, एमएच-सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीकरीता 30 जुलैपर्यंत मुदतवाढ
गोंदिया, दि.17 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थे कडून युजीसी-नेट, सीएसआयआर-नेट, एमएच-सेट – 2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पूर्व तयारीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्डमध्ये उपलब्ध अप्लिकेशन ट्रेनिंग या मोडवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करता महाज्योती कडून युजीसी-नेट, सीएसआयआर-नेट, एमएच-सेट – 2023-24 परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक 30 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याकरीता सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. टपालाव्दारे, प्रत्यक्ष किंवा ई-मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.