गोंदिया पब्लिक शाळेत ‘ग्रीन डे’ उपक्रम हर्षोल्हासात साजरा

0
10

गोंदिया-डी.बी.एम शिक्षण संस्था द्वारा संचालित गोंदिया पब्लिक शाळेत ‘ग्रीन डे’ हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. वसुंधरेच्या संवर्धनासाठी कृषि मंत्री, भाऊसाहेब फुंडेकर यांच्या गो ग्रीन, शासन मोहिमेनुसार संपूर्ण राज्यभर ग्रीन डे 5 जुलै ला साजरा केला गेला . याची दखल घेता गोंदिया पब्लिक प्रीप्रायमरी च्या चिमुकल्यांनी ग्रीन डे साजरा करून जनजागृत करण्याचे प्रयत्न केले. विद्यार्थी हिरव्या पोशाखात अतिशय सुंदर आणि उत्साही दिसत होते. छोट्या चिमुकल्यांनी गो ग्रीन संकल्पना लक्षात घेता सुंदर कविता व गाणी प्रस्तुत केल्या लहान लहान ग्रीन वॉरियर्सनी हिरव्या रंगाचे प्रतिनिधित्व करित विविध माध्यमातून जसे हिरवी झाड़े, हिरवे पक्षी, प्राणी, फळे यांची वेशभूषा करून वसुंधरेच्यां हिरव्या रंगाचा जो सुपिकता आणि समृद्धीचा संदेश दिला. बाल चिमुकल्याणी पालकांच्या मदतीने प्लास्टिकबॉटल पासून लहान आकर्षक कुंड्या तयार करून त्यात झाडांची लागवड केली तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले गेले . सर्व विद्यार्थ्यांनी उपक्रमाचा आनंद धेतला .प्री- प्रायमरी विभाग प्रमुख शारदा ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना पृथ्वी मातेबद्दल काळजी दर्शविण्यात सांगितले. मार्गदर्शन करताना प्राचार्या रिंकू बैरागी यांनी म्हटले की, ग्रीन डे उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन पृथ्वी मातेचे रक्षण व वसुंधरे बद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे .
संस्थाध्यक्ष प्रो. अर्जुन बुद्धे ,सचिव डॉ. इंदिरा सपाटे यांनी पर्यावरणाची काळजी घेणे ही प्रत्येकाची जवाबदारी आहे . तसेच श्वास घेण्यासाठी सुंदर व आकर्षक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी प्रत्यकाने आपल्या वसुंधरेची काळजी घेणे, काळाची गरज असल्याचे सांगितले. उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.