गोरेगांव :– स्थानीय मॉडेल कॉन्वेंट एंड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मध्ये बेस्ट प्लांट कॉन्टेस्ट कार्यक्रमाचे आयोजन 12 ऑगस्ट रोजी करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक सचिव प्रा. आर. डी. कटरे हे अध्यक्षस्थानी तर बीआरसी विषयसाधन व्यक्ति सुनील ठाकूर, शाळेचे प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले, प्राचार्य सौ. सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु. एस. डी. चीचामे, स. शि. श्री आर. बी. कोल्हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्लांटचे फित कापून करण्यात आली. उपरोक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्ग 8 वी च्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी आणलेल्या विविध प्रकारच्या प्लांट बद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आणलेले प्लांट शाळेला भेट देण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी कडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. आर. डी. कटरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनातून विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी विभागाकडून करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारि यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 8 वी ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी मडावी व निषाद पटले तर आभार कु. दिशा चौधरी हिने मानले.