महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज सादर करा 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

0
7

वाशिम, दि. 24  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशीप व इतर शैक्षणिक योजनांचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी आणि सन २०२1-२२ या शैक्षणिक वर्षातील अर्ज पुन्हा भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. महाडिबीटी प्रणालीवर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यास वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतू अद्यापपर्यंत काही विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भलेले नाही.

         सद्यस्थितीत सन 2023-24 सुरु झालेले आहे. या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु होणार आहे. त्यामुळे ज्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज महाडिबीटी पोर्टलवर भरलेले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आणि सन २०२1-२२ या शैक्षणिक वर्षातील अर्ज पुन्हा भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत शासनाकडून देण्यात आलेल्या मुदतवाढील भरुन घ्यावा. यानतर मागील वर्षाचे अर्ज भरण्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही.

           तरी अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील योजनेस पात्र https://mahadbtmahait.gov.in यामहाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज भरण्यात यावे. महाविद्यालयाचे प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील प्रवेशित शिष्यवृत्ती योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाडिबीटीच्या संकेतस्थळावर विहीत मुदतीत भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. या प्रवर्गातील पात्र विद्यार्थी अर्ज भरण्यापासून व शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहील. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क महाविद्यालयास आकारता येणार नाही. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.