
गोंदिया,दि.24- एक्यूट पब्लिक शाळेत निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थयांनी गुप्त मतदान पद्धतीने वर्ग प्रमुखाची नियुक्ति केली. लोकशाही शासनप्रणाली मध्ये प्रत्येक भारतीय नागरीकांना वयाच्या १८ व्या वर्षी मतदान करण्याचे अधिकार दिले आहे.या प्रक्रियेला अनुसरुन शालेयस्तरावर विद्यार्थी प्रतिनिधि प्रमुख यांची निवड करण्यात आली.
या प्रक्रियेमध्य शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी (शाळाप्रमुख) महणून वेदांत भालाधारे वर्ग ९ वी चे निवड करण्यात आली. तसेच शाळाप्रमुख विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. सुरेखा बघेले वर्ग ११ वी चे निवड करण्यात आली. उपशाळाप्रमुख जितिन ठाकरे वर्ग ७वी व शगुन पारधी वर्ग ६वी, शालेय सांस्कृतिक प्रमूख कु. अपूर्वा भास्कर वर्ग १२वी, शालेय क्रिडाप्रमुख कुणाल उइके वर्ग ९०वी, शालेय स्वच्छता प्रमुक गणेश नागपुर वर्ग १२वी, शालेय शिष्ट प्रमुख कु. लुभानी ठाकरे वर्ग ९वी, कु. आलेहा शेख वर्ग ५वी, प्रथम हत्तीमारे वर्ग ५वी, ओजस मेश्राम वर्ग ५वी यांची निवड करण्यात आली. निवडणुक प्रक्रियेचे आयोजन सौ. छाया मैडम, सौ. नंदा मैडम, कु विजया मैडम यानी केले.विद्यार्थी प्रमुखांचा सत्कार करून त्यांना शपथ देण्यात आली.
या प्रसंगी “संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे” सचिव संजय भास्कर, सह सचिव श्रीमती एस. शुभा, शळेचे मुख्याध्यापक श्रीमती उज्जवला, उप प्राचार्य कापगते, शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षणकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शालेय नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधीचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले.