तिरोडा:– समर्थ भारताच्या निर्मितीचे तेजोमय स्वप्न व विद्येची आशा इवल्याशा पाखरांच्या डोळ्यात फुलवण्याच्या उद्देशाने पं. स. तिरोड़ा आणि स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 नवंबर गुरुवारला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे उदघाटन समारोह संपन्न झाले.
उदघाटनिय समारोह कार्यक्रमाला उदघाटक म्हणुन विजयभाऊ रहांगडाले आमदार विधानसभा क्षेत्र तिरोड़ा /गोरेगाव यांचे प्रतिनिधित्व प्रविण पटले जि. प. सदस्य गोंदिया यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुंताबाई पटले सभापती पं. स. तिरोड़ा,प्रमुख अतिथी हूपराज जमईवार उपसभापती,प्रमुख उपस्थितीत किरणकुमार पारधी जि. प. सदस्य गोंदिया,चत्रभुज बिसेन जि.प.सदस्य,जगदीश बावनथडे जि. प. सदस्य,रजनीताई कुंभरे जि. प. सदस्य,तुमेस्वरीताई बघेले जि. प. सदस्य,चेतलाल भगत पं. स. सदस्य,जितेंद्र चौधरी पं. स. सदस्य,तेजराज चव्हान पं. स. सदस्य,जयप्रकाश पटले पं. स. सदस्य,विजय बिनझाडे पं. स. सदस्य,ज्योतिताई शरणागत पं. स. सदस्या,सुनंदाताई पटले पं. स. सदस्या,उमाशंकर गंजीरे शा. व्य. स. अ.,डॉ. रामेश्वर पटले, गौरीशंकर पारधी,सुखदास शरणागत उपस्थित होते.
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या कार्यक्रमाची सुरुवात मीसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण अर्पण करून दिप प्रज्वलित करून करण्यात आली. तद्नंतर मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व उदघाटनिय प्रास्ताविक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून नावीन्यपूर्ण कल्पनांचा विकास करीत विज्ञानातील तंत्रज्ञानामध्ये प्रगती करावी शैक्षणिक साहित्यामध्ये भर घालावी, असे आपल्या प्रास्ताविकात श्री मा. व्ही. एस. चौधरी गटशिक्षणाधिकारी पं. स. तिरोड़ा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्याच बरोबर वरिष्ठ विस्तार अधिकारी पं. स. ए. एस. बरईकर तसेच वरिष्ठ विस्तार अधिकारी डी. बी. साकुरे यांनी भावी वैज्ञानिक घडवून आणण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महान मीसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या सारखे वैज्ञानिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक चांगले व वाईट परिणाम विद्यार्थ्यानी पाहिले असतिल जसे मोबाईल फोन चा उपयोग चांगला किंवा वाईट याचे महत्व, तसेच विद्यार्थ्यानी या तंत्रज्ञान युगाचा उपयोग भविष्यात देशासाठी कसा करावा असे आवाहन आपल्या उद्घाटनप्रसंगी प्रविण पटले जि. प. सदस्य गोंदिया यांनी केली, तद्नंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्व व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न कसा करावा हे आपल्या संभाषणातून व्यक्त केले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य जी. एच. रहांगडाले, के. बी. बन्सोड, पी. एस. रहांगडाले, कु. वाय. यू. राऊत, कु. रक्षिता मेश्राम, उमेंद्र रहांगडाले, के. जी. आगाशे, अनिल नेरकर, अरविंद ठाकरे, रमेश दमाहे, विनोद हरीणखेडे, कु. एस. डी. पटले, कु. शुभांगी मेश्राम, कु. ऊर्जा कटरे, बी. पी. बिजेवार, कु. रहांगडाले मॅडम, हरडे मॅडम, कु. स्मिता पोलशेट्टीवार, कु. श्वेता मेश्राम, कु. एस. ए. चौहान, श्री. मारबदे, देवा वरठे, मीना बाई खंगारकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे संचालन मा. श्री के. बी. बन्सोड व आभार मा. पी. एस. रहांगडाले यांनी केले.