एस.एस.जायस्वाल महाविद्यालयात वार्षिकोत्सव ‘घे भरारी’चे उद्घाटन
अर्जुनी मोर. – आजचा तरुण केवळ विविध समाज माध्यमा मध्ये दिवसेंदिवस गुंतत चालला आहे. यामुळे तरुणांची विचार शक्ती नष्ट होऊ लागली आहे. मोबाईल, इंटरनेट च्या अती उपयोगाने तरुण दिशा भटकू शकतो. म्हणून या पासून थोडे दूरच राहायला हवे. विचारशक्ती नष्ट झाल्याने तुम्ही अस्वस्थ होणार नाही आणि अस्वस्थ झाल्या शिवाय उत्तम कार्याची निर्मिती होऊ शकत नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य लेखक आणि कलावंत सदानंद बोरकर यांनी केले. ते स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयाच्या ‘घे भरारी’ वार्षिकोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या वेळी अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष लुनकरण चितलांगे हे होते. तसेच विशेष अतिथी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर आणि संस्था उपाध्यक्ष बद्रीप्रसाद जायस्वाल,संस्था सचिव मुकेश जायस्वाल, संस्था सदस्य ममता जायस्वाल, प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले, रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ पी.एस. डांगे, IQAC समन्वयक डॉ के.जे. सिबी, वार्षिकोत्सव प्रभारी डॉ. शरद मेश्राम, सह प्रभारी डॉ. गोपाल पालीवाल, क्रीडा विभाग प्रभारी प्रा राजेश डोंगरवार आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयातील पक्षी मित्र व अभ्यासक ग्रंथपाल अजय राऊत , डॉ शरद मेश्राम आणि डॉ गोपाल पालीवाल यांनी काढलेल्या विविध छाया चित्रांच्या प्रदर्शनीचे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
स्व.शिवप्रसाद जायस्वाल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. करण्यात आले. अनुश्री बैरागी आणि शिवली दास यानी सादर केलेल्या उद्घाटकीय नृत्याने प्रमुख पाहुण्यांचे तसेच सर्वांचे मन जिंकून घेतले .
प्रास्ताविकातून डॉ. शरद मेश्राम यांनी वार्षिकोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्राचार्य ईश्वर मोहुर्ले यांनी पाहुण्यांचे परिचय करून दिला तसेच विविध स्पर्धा , कार्यक्रम, उपक्रम, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांकरिता चालविण्यात येणाऱ्या विविध योजना इ. बाबत सविस्तर माहिती दिली.
विशेष अतिथी डॉ. श्याम कोरेटी यांनी एन ई पी 2020 संदर्भात अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शेक्षणिक धोरण 2020 हे आजच्या परिप्रेक्ष्यात उपयोगी आहे विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याचे पटवून दिले . डॉ. संजय कवीश्वर यांनी , सर्वांगीण विकास हा एन इ पी 2020 चा मूळ गाभा आहे . कौशल्यावर आधारित शिक्षण ही आजची गरज असून त्याकरिता मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे असे मत या प्रसंगी व्यक्त केले .
यावेळी इंग्रजी विभागातील डॉ. स्वाती मडावी यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्राध्यापक परिषदेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ पी.एस. डांगे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ च्या व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव कापगते याला महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन तर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशनल चॅलेंज जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हा स्तरीय विजेता म्हणून निवड करण्यात आली. Re-use of e-waste in other electronics devices या विषयावर प्रकल्प सादर केला. याकरिता त्याला 1 लक्ष रुपयाचे बीज भांडवल देण्यात आले. या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन प्रतीक चव्हाण आणि कु. खुशबू छेती यांनी केले तर आभार प्रदर्शन सहप्रभारी डॉ गोपाल पालीवाल यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.