Home शैक्षणिक ककोडी येथे शिक्षकांचा गुणगौरव व यथोचित सत्कार सोहळा

ककोडी येथे शिक्षकांचा गुणगौरव व यथोचित सत्कार सोहळा

0

‘आमची शाळा, आदर्श शाळा’ स्पर्धेमध्ये देवरी तालुक्यातील शाळेचे नाव लौकिक केल्याबद्दल सत्कार सोहळा

देवरी,दि.२८: गोंदिया जिल्हा परिषदे मार्फत शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या विविध शैत्रणिक स्पर्धांमध्ये तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शाळांनी मानांकन मिळविले. या निमित्ताने ककोडी समूहसाधन केंद्राच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी यांचा यथोचित सत्कार मंगळवार (दि.२७)करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य उषा शहारे ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पं. स.सदस्य भारती सलामे,
देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, उचेपूरच्या सरपंच शेवंता गहाने,श्री भरणे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशकुमार बडोले, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप बडोले आदी मान्यवर उपस्थित होते.

ककोडी केंद्र हा जिल्ह्याच्या टोकावरील अतिशय दुर्गम क्षेत्र व अतिसंवेदनशील क्षेत्र अशी ओळख असलेला केंद्र आहे.  या केंद्रातील शाळेने संपूर्ण जिल्हयात शिक्षकांनी, विद्यार्थी व गावकरी यांच्या सहकार्याने त्यांचे शाळेचे, केंद्राचे व तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. अशा शाळांचा, शिक्षकांचा गुणगौरव व यथोचित सत्कार सोहळा पार पडला. समूह साधन केंद्र ककोडी आणि जि.प.सदस्य उषा शहारे यांच्या द्वारे जिल्हा परिषद प्राथ.शाळा उचेपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
जिल्हा परिषद गोंदिया आणि अदानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमची शाळा आदर्श शाळा या स्पर्धेमध्ये देवरी तालुक्यात प्रथम व जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद प्राथ शाळा उचेपूर शाळेचे शिक्षक दिलीप शिवणकर सर व शिक्षिका प्रियंका रामटेके (वाहने) मॅडम आणि याच स्पर्धेमध्ये देवरी तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त जि. प. प्राथ. शाळा येडमागोंदी शाळेचे शिक्षक प्रशांत बडोले  यांचा शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद व प्राथ शाळा मेहताखेडा या शाळेचे देवरी तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक आल्याबद्दल शाळेचे शिक्षक विरेंद्र खोटेले, चंद्रकांत लांजेवार, वर्षा बडवाईक व प्रिन्स गजभिये  तसेच नेतृत्व कौशल्याने – उत्कृष्ट प्रशासन, सामंजस्य भूमिका, सहकार्य वृत्तीने ककोडी केंद्राचे नावलौकिक केल्याबद्दल ककोडी केन्द्राचे केन्द्र प्रमुख एस.जी.राऊत या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संचालक राजेश रामटेके , सुजित बोरकर, शैलेश बागडे,अतुल गणवीर, आशिष रंगारी, कुंदन ठेंगाहे , दिपक लांजेवार,श्रीमार्गाये सर, श्रीचौरागडे सर, नितीन कुंभरे,मनीष नागभिरे, कृष्णा बावनकर, रोशन कराडे, श्रीघुगे सर,श्रीसोनकुकरा सर, किशोर नेताम,जितेंद्र कानतोडे आदिंनी सहकार्य केले.

Exit mobile version