Home शैक्षणिक जिल्हास्तरीय निपुण भारत कार्यशाळा संपन्न; विविध शैक्षणिक साहित्य स्टॉलचे प्रदर्शन.

जिल्हास्तरीय निपुण भारत कार्यशाळा संपन्न; विविध शैक्षणिक साहित्य स्टॉलचे प्रदर्शन.

0

गोंदिया, (दि. 21): निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय निपुण भारत कार्यशाळा व निपुणोत्सव कार्यक्रम आज(दि.19) स्थानीय पुंजाभाई पटेल अध्यापक विद्यालयाचे सभागृहात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदियाचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा परिषद गोंदियाचे शिक्षणाधिकारी(प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (योजना) सुधीर महामुनी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिव्याख्याता सरस्वती सूर्यवंशी, अधिव्याख्याता पूनम घुले, डॉ. भाऊराव राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल चव्हाण, समग्र शिक्षा चे सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व जिल्ह्याचा निपुण सादरीकरण अधिव्याख्याता तथा विभागप्रमुख पूनम घुले यांनी केले. त्यानंतर गोंदिया तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा एकोडी(दां) चे मुख्याध्यापक तथा दांडेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख एन. जी. डहाके यांनी आपल्या शाळेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. उपस्थित शिक्षणाधिकारी (योजना) सुधीर महामुनी यांनी आपल्या मार्गदर्शनात निपुण भारत अभियानाचे उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी प्रशासन, शिक्षक व पालक या त्रिसूत्रीला एकत्र येऊन काम करावे लागेल तरच बालक हा निपुण होईल असे मत व्यक्त केले. तर शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये यांनी ‘विद्यार्थी विकास हेच अंतिम ध्येय’ असून शिक्षकांनी या ध्येयपूर्तीसाठी काम करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डायटचे गोंदिया चे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘डायट व शिक्षण विभाग जिल्ह्यात समन्वयाने कार्य करीत असून विद्यार्थी गुणवत्तेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत’ असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रथम सत्राचे संचालन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. भाऊराव राठोड यांनी केले तर आभार वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती सरस्वती सूर्यवंशी यांनी मानले.

शैक्षणिक साहित्याचे मूल्यांकन- जिल्हास्तरीय या निपुणोत्सव कार्यक्रमात तालुकानिहाय उपक्रमशील शिक्षकांनी स्वयं प्रेरणेने तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्या शैक्षणिक साहित्याचे अवलोकन पी.पी. बी. एड. कॉलेज चे प्राचार्य डॉ. आर. एल. निकोसे सह सर्व उपस्थित अधिकारी वर्गानी केले व साहित्याचे मूल्यांकन पुंजाभाई पटेल अध्यापक विद्यालयाच्या अध्यापकाचार्या श्रीमती विद्या येटरे व श्रीमती टीना ठाकरे यांनी केले त्यामध्ये प्रथम क्रमांक जि.प. प्रा. शा. गंणखैराटोला(ता. गोरेगाव)च्या शिक्षिका श्रीमती स्मिता मच्छिरके, व्दितीय क्रमांक जि.प. व. प्रा. शा. अंभोरा (ता. गोंदिया) चे शिक्षक मनोज गणवीर, तर तृतीय क्रमांक जि.प.प्रा. शा. जानाटोलाचे शिक्षक यु. एन. डोलारे व जि.प.प्रा. शा. जानाटोलाचे शिक्षक के. जे. चव्हाण यांना संयुक्तपणे मिळाला आहे. सर्व सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातील भाषा, गणित साधनव्यक्ती व एक केंद्रप्रमुख यांना निपुण मित्र म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षक सुनील हरिनखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, भाऊलाल चौधरी, प्रदीप वालदे, देविदास हरडे, शालिनी रहांगडाले, मंगला बडवाईक, उर्मिला वैद्य, ओमप्रकाश ठाकरे, शिक्षक दिनेश उके, शालिक कठाने यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version