Home शैक्षणिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

0

गोंदिया,दि.०६ः– गोंदिया शिक्षण संस्था द्वारे संचलित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११५ वी जयंती गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन,संचालक निखिल जैन, प्राचार्य डॉ.अंजन नायडू व उपप्राचार्य प्रोफेसर जयंत महाखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डॉक्टर अंजन नायडू यांनी तुकडोजी महाराजांच्या जीवनाशी निगडित घटना विषयी उपस्थितांना सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.स्नेहा जैस्वाल यांनी केले. तसेच याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रसिद्ध भजन उपस्थितानी गायले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.मनोज पटले, प्रा. धरमवीर चौहान कु. अवनी मेठी यांचे सहकार्य लाभले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version