
गोंदिया,दि.३०ः– पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नंगपुरा मुर्री केंद्र अंतर्गत नवबौद्ध मूलांची शासकीय निवासी शाळा, नंगपुरा येथे पहिले शिक्षण परिषदच्या आयोजन 27 जुलैला करण्यात आले होते.या पहिल्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिति गोंदियाचे सभापती मूनेश रहांगडाले, तर विशेष मार्गदर्शन म्हणून गटशिक्षणाधिकारी पी.पी.समरित गटशिक्षणाधिकारी, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक आर.पी.ईठ्ठले,विस्तार अधिकारी के.के.पटले तसेच केंद्रातील सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना सभापती मुनेश रहांगडाले यांनी राज्यातील शाळा डिजीटल करण्यासह विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निष्पत्ती (लर्निंग आऊटकम) 100 टक्के करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला असता महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात 18 व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ध्येय ठेवून शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता वाढवण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे म्हणाले.
सभापती रहांगडाले पुढे म्हणाले, शासनाचे दुर्लक्ष आणि दुर्देवाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. शासनस्तरावर शिक्षक भरती होत नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण भागाचे जीवनवाहिनी आहेत, हे शाळेत त्या ग्रामीण भागात विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग आहे. या शाळांमधून अनेक मुले, मूली, प्रगत होऊन शिक्षक व अधिकारी झाली आहेत. मात्र सध्या शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी इतर शाळांकडे वळत आहेत. शाळेत पटसंख्याची संख्या कमी होत आहे, हा मोठा प्रश्न आहे, यावर शासनाने लक्ष्य केंद्रित केली पाहिजे.
विद्यार्थ्याला शालेय शिक्षणातून नेमके काय दिले पाहिजे याचे निकष निश्चित केल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी तिघांचे उत्तरदायित्व वाढले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिति शाळेतले शिक्षक राबवत असलेले वेगवेगळे प्रयोग, शिक्षकांची शिकवण्याची कल्पकता प्रयोगशील शिक्षकांचे हे यश आहे. या शिक्षकांनी वेगवेगळे पध्दतिने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रास्ताविकात केंंद्रप्रमुख केदार गोटेफोडे यांनी परिषदेचे व्याप्ती व महत्त्व विशद केले.केंद्रातील पदोन्नती आणि बदली होऊन आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षिकांचे पुष्प, पेन, फोल्डर देवून हार्दिक स्वागत करण्यात आले. अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आले.
या शिक्षण परिषद मध्ये शिक्षण परिषद कशासाठी ? सुलभक:सौ.अरुणा बोम्बांर्डे मुख्याध्यापक पिंडकेपार, विद्या समीक्षा केंद्र विकेसी:जी.एम.बांते वि.शि.रापेवाडा,`बाह्य मुलांचे शाळा प्रवेश: कु.पूजा चौरसिया, स.शि.कारंजा,पायाभूत चाचणी:-नागसेन भालेराव मुख्याध्यापक पांगडी अध्ययन स्तर निश्चिती: एम.आर.ठाकरे प.शि.ढाकणी, कृती आराखडा:अजय कावळे मुख्याध्यापक चिचटोला यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.परिषदेला केंद्रातील जि.प.व खाजगी अनुदानित शाळेतील एकूण ६५ शिक्षक व शिक्षिका हजर झाले होते.