विसापूर नं १ शाळा तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत प्रथम जिल्हास्तरीयसाठी पात्र

0
1426

तासगाव/दि.५::महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा सन २०२४ – २५ क्रिडा प्रकार खो खो स्पर्धा नुकतेच विसापूर तालुका तासगाव येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेत १४ वर्षे खालील वयोगट मुले या गटामध्ये जिल्हा परिषद शाळा विसापूर नं १ ही शाळा अजिंक्य राहून जिल्हा स्तरासाठी पात्र ठरली.
सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात विद्यार्थी व मार्गदर्शक यांचा गौरव जिल्हा परिषद सदस्य अर्जुन ( बापू ) पाटील यांचे हस्ते सन्मान चिन्ह देवून करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षक दीपक काळे , मुनाफ नदाफ व विसापूर मधील युवा खेळाडू अभिजित पाटील , धीरज गायकवाड , ऋषिकेश , मयूर , विनय , काका माने परिश्रम घेतले व सर्व युवा सहकारी तसेच शाळा नं १ व २ चे सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद सर्व स्तरांतून होत कौतुक होत आहे