कारमेल अकॅडमी मध्ये ग्रँन्ड पॅरेन्टस डे मोठ्या उत्साहात

0
24

देसाईगंज: आज 5 ऑक्टोंबर रोजी कारमेल अकॅडमी मध्ये आजी आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांच्या जीवनात आजी-आजोबांचे किती महत्वाचे स्थान आहे. या दोन पिढ्यांच्या मधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक जिनेश मॅथ्यू यांनी आयोजित केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्राची वालदे , डॉ संजय सहारे व कारमेल अकॅडमीच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर लिटी उपस्थित होते.
डाॅ प्राची वालदे यांनी आपल्या भाषणातून आजी-आजोबांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत समजावून सांगितले. तसेच डाॅ.संजय सहारे यांनी आजी-आजोबांचे महत्त्व आणि कुटुंबातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला वर्ग १ ते ४ चे आजी आजोबा, पालक व विद्यार्थी उपस्थित होते . अनेक आजी-आजोबांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शविला.विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. आजी आजोबांनी आपल्या नातवांसोबत नृत्य व गीत सादर केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक फादर जिनेश मॅथ्यू ,उपमुख्याध्यापिका सिस्टर लिटी, स्टाफ सेक्रेटरी दिशाली चावके, वर्ग १ ते ४ चे वर्ग शिक्षकवृंद सर्वांनी मोलाचे योगदान दिले.

.