बारावीत पी. डी. राहांगडाले कनिष्ठ महाविद्यालय यशाची परंपरा कायम

0
44

गोरेगाव,दि.०६ः स्थानिक पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या इ. १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा निकाल 95% लागला असून, कला शाखा 90 % तर विज्ञान शाखेचा 100 % आहे. अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
यावर्षी विज्ञान आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यामध्ये “विज्ञान शाखेतून अपूर्व मोरेश्वर क्षीरसागर 67.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, रोहिणी यादोरावं पटले 66.67% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला,आणि उज्वल राधेश्याम कटरे 64.33% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कला शाखेत अंजली जितेंद्र मोहबे 80.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक, तुलसी राजकुमार रोकडे 77.67% गुण मिळवत द्वितीय क्रमांक आणि पल्लवी चेतनदास कोहळे 76.00%गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या यशामागे महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षकवृंद आणि पालकांचे योगदान महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांच्या परिश्रमांना यश मिळाले आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ.टी.पी.येडे,सचिव एड.टी.बी.कटरे,संचालक यु.टी.बिसेन महाविद्यालयाचे प्राचार्य सी.डी.मोरघडे,पर्यवेक्षक ए.एच.कटरे तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पी. डी. राहांगडाले कनिष्ठ महाविद्यालयाने याआधीच्या वर्षी देखील उल्लेखनीय निकाल देत सातत्याने गुणवत्तेचा उच्च स्तर राखला आहे.