न्यू सेल्फिन डिफेन्स अकॅडमी तिरोडा यांनी जिंकले गोंदिया डिस्ट्रिक्ट किकबॉक्सिंग स्पर्धेत ६ सुवर्ण व १ कांस्यपदक

0
61

चित्रा कापसे/तिरोडा —गोंदिया डिस्टिक किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५- २६ चे आयोजन अम्युचर किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ गोंदिया ईगल किक बॉक्सिंग एकेडमी द्वारा के.के इंग्लिश प्राइमरी स्कूल आमगाव येथे रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते यात तिरोडा तालुक्यातील न्यू सेल्फिन अकॅडमी तिरोडा येथिल ७ विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी स्पर्धेमधे ६ सुवर्ण व १ कास्य पदके जिंकून बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड़ करण्यात आली, यामध्ये
सुवर्ण पदक कु.सलोनी ऊईके ,कु.वंशिका येसने ,कु. सौम्या मानकर ,लेखनी पारधी , निष्ठा जगने ,श्रावणी साठवने यांनी जिंकले असून त्यांनी आपला यशाचे श्रेय तिरोड़याचे एकमेव अधिकृत मुख्य प्रशिक्षक चंद्रप्रकाश प्रजापति,आकाश शहारे याना दिले असून या यशाकरिता आमदार विजय राहंगडाले ,माजी सभापती न.प.अशोक असाटी,राजेश असाटी पब्लिक स्कूल चे संस्थापक राधाकृष्ण शेंडे,ग्लोरियस माउंट एकेडमी चे संस्थापक विलास नागदेवे, दीपक घरजारे,विकेश मेश्राम,अमन नंदेश्वर,राजेश वरठे,अतुल बिंझाडे,कु निशारानी पांडे व पालकांनी भविष्याच्या प्रगती साठी शुभेच्छा दिल्या.