असीम सराफ शाळेने मारली बाजी,शाळेचा निकाल १००%

0
33

असीम सराफ मधील सिद्धी असाटी तालुक्यातून प्रथम
तिरोडा-नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ग१० वी चा CBSE च्या निकालात असिम सराफ शाळेने बाजी मारली असून दरवर्षी ची १००% निकालाची परंपरा कायम ठेवत तालुक्यातून प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यात गुणवत्ता यादीत शाळेतून तिरोडा तहसिल प्रथम कु सिद्धी असाटी ९८ टक्के घेवून उच्चांक गाठला. तसेच कु अश्मिरा शेख ९४ टक्के , आयुष रहांगडाले ९१.२ टक्के , हर्षा माखिजा ९१ टक्के , अज्जु बिसेन ९० टक्के घेवून विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले. शाळेचा निकाल१०० टक्के लागला. शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षासोनी, उपमुख्याध्यापिका रिना जायस्वाल तसेच संस्थेचे सचिव पंकज सराफ,अनील सराफ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांना व पालकांना दिले