प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने शिक्षक समितीने शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांना दिले निवेदन

0
33

15 मार्चचा शासन निर्णय व शिक्षण सेवक योजना रद्द करा शिक्षक समितीची मागणी

गोंदिया,दि.१६ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया तर्फे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना शिक्षण सेवक योजना रद्द करावी सोबतच 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करण्यासंदर्भातली निवेदन देवरी आमगाव क्षेत्राचे आमदार यांचे नेतृत्वात देण्यात आले.
शिक्षक समाज व विद्यार्थी हिताच्या प्रलंबित मागण्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाचे शिष्टमंडळ मुंबई येथे मंत्रालयात नामदार शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या संचमान्यतेमध्ये हजारो पदे जिल्हा परिषद शाळेमधील अतिरिक्त ठरत असून शाळा बंद पडून गोरगरिबांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षण सेवक योजना सध्या परिस्थितीत उशिरा लागलेल्या शिक्षकांना आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणणारी असल्यामुळे संचमान्य ते संदर्भातला शासन निर्णय व शिक्षण सेवक योजना बंद करावी यासह विवीध प्रमुख मागण्याचे निवेदन शिक्षक समितीने राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करुन प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली असता राज्याचे शिक्षणमंत्री यांनी मुंबई येथे सचिवस्तरीय सभा आयोजित करून मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून आवश्यक ते सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले यावेळी निवेदनात शिक्षण सेवक योजना रद्द करणे, 15 मार्च 2024 च्या शासन निर्णय रद्द करून जुन्याच शासन निर्णयानुसार संच मान्यता नव्याने अद्यावत करणे, १ नोव्हेंबर २००५ नंतर लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक बांधवांचा तीन दिवसाचा संप कालीन वेतन अदा करणे,मुख्यालयाची अट शिथिल करणे, सरसकट पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ देणे,रिक्त पदांवर शिक्षकांची लवकर भरती करणे, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करणे, जीर्ण झालेल्या इमारतींकरता निधी उपलब्ध करून देणे, स्वयंपाकिन,मदतनिसांच्या मानधनात वाढ करणे, 10 ,20, 30 ची आश्वासित प्रगती योजना लागू करणे,आंतरजिल्हा बदली शिक्षकांची सेवा जेष्ठता गृहीत धरने ,शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढून अवास्तव प्रशिक्षण बंद करणे,विनाअट उच्च प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापकाची नेमणूक करणे,शिक्षण सेवक कालावधी मधील तीन वेतनवाढ लागू करणे या मागण्याचा समावेश होता. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी भेट घालून सविस्तर शिक्षक मागण्या संदर्भात चर्चा घडवून आणल्याबद्दल तिरोडा आमदार विजय रहांगडाले यांचे शिक्षक समितीने आभार मानले

यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा प्रतिनिधी उमेश रहांगगडाले, कृती समिती समन्वयक एस यु वंजारी यासह शिक्षक समिती पदाधिकारी उपस्थित होते.