दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया २० मेपासून सुरु

0
14
वाशिम,दि.२० मे – तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता राज्यातील अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि. २० मे पासून सुरु झाली आहे. १६ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्राच्या स्कंन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे, आणि अर्ज निश्चिती करणे इ.या https://poly25.dtemaharashtra.gov.in/ संकेतस्थळावर करता येईल.
ऑनलाइन अर्ज भरणे व निश्चिती करणे याकरिता उमेदवार त्यांच्या सोयीनुसार छाननी पद्धती /पर्याय निवडू शकतील पर्याय १. उमेदवार ऑनलाईन नोंदणी करून ई- स्क्रूटनी पद्धतीचा पर्याय निवडून शकतील . या पद्धतीमध्ये उमेदवार कोणत्याही ठिकाणावरून इंटरनेटशी जोडलेल्या संगणक किंवा स्मार्टफोन द्वारे ऑनलाईन अर्ज भरतील आणि सबमिट करतील व आवश्यक कागदपत्रे अपलोड करतील तसेच उमेदवाराला अर्जाच्या पडताळणीसाठी व निश्चितीसाठी कोठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही उमेदवाराचा अर्ज व कागदपत्रे सुविधा केंद्राद्वारे (एफसीद्वारे) पडताळले जातील व निश्चित केल्या जातील.
पर्याय २. उमेदवार मोबाईल वरून किंवा स्मार्टफोन अथवा संगणकावरून ऑनलाइन नोंदणी करून प्रत्यक्ष स्क्रूटनी पद्धतीचा पर्याय निवडू शकतील ज्या उमेदवाराकडे संगणक अथवा मोबाईल स्मार्टफोन इत्यादी सुविधा नाहीत असे उमेदवार त्यांच्या सर्वात जवळील सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी व सोयीस्कर वेळ ठरवण्यासाठी जाऊ शकतील अशा प्रकारे ऑनलाईन नोंदणी झालेले उमेदवार पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्राची तारीख वेळ ठरवून घेतील उमेदवार ऑनलाईन अर्ज भरणे स्कॅन करून आवश्यक कागदपत्र अपलोड करणे इत्यादी प्रक्रिया सुविधा केंद्रावर स्वतः निशुल्कपणे करू शकतील उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेस सुविधा केंद्रावर उपस्थित राहून अर्ज अर्ज पडताळणी करावी.
शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे ऑटोमोबाईल, सिव्हील, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व मेकॅनिकल एकूण सहा शाखा आहेत. प्रवेशप्रक्रिया व विविध शाखांची माहिती व महत्व तसेच आवश्यक असलेले कागदपत्रे १. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) २. नॉन क्रीमिलेयर (लागू असल्यास) ३. उत्पनाचा दाखला, ४. डोमासाईल, व ५. नॅशनॅलिटी प्रमाणपत्र इ. माहितीसाठी समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. काही अडचण आल्यास एफसी समन्वयक प्रा.वाय.व्ही. लहाने ९८२३६५५८२९ यांना संपर्क करावा. तरी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा वाशिम जिल्ह्यातील व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. बी. जि. गवलवाड यांनी केले आहे.