
तिरोडा-ग्लोरियस माऊंट अकॅडमी शाळेतील इयत्ता 5 वी मधील विद्यार्थी लक्ष्य शैलेंद्र पटले, जतिन रत्नदीप भास्कर, नक्ष संतोष पारधी आणि ओजस सूरज गजभिये यांची AISSEE 2025 मध्ये सैनिक शाळेतील इयत्ता 6 वी साठी निवड झाली आहे.
कठोर शैक्षणिक आणि लष्करी प्रशिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित सैनिक शाळांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी AISSEE 2025 ही एक मौल्यवान संधी आहे. या शाळा विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दल आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक मजबूत पाया प्रदान करतात. विद्यार्थ्यांना परीक्षेची कसून तयारी करण्यास आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करण्यास प्रोत्साहित केले जाते.
सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाल्यावर शाळेचे संचालक आणि संस्थापक विलास नागदेवे आणि सर्व शिक्षकांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातही असेच यश मिळविण्यासाठी त्यांना प्रेरित केले.
अभिनंदन करताना संचालक म्हणाले, “केवळ कठोर परिश्रमानेच कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळते.चारही विद्यार्थी अभिनंदनास पात्र असून त्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले