आज जिल्हा परिषदेत ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारांचे वितरण

0
12

गोंदिया,दि.6- आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात आज ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, मुकाअ व जि.प.च्या इतर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून दरवर्षी शिक्षकदिनी जिल्हास्तरिय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देण्यात येतात. यासाठी प्रत्येक पंचायत समितीमधून प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येकी एका शिक्षकाची यासाठी निवड केली जाते.यावर्षी ९ पुरस्कारांसाठी शिक्षकांनी अर्ज केले आहेत.
आदर्श शिक्षक म्हणून निवड झालेल्यांमध्ये प्राथमिक विभागात गोंदिया तालुक्यातून सुनंदा रमेश ब्राम्हणकर, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा अर्जुनी यांची निवड झाली आहे. आमगाव तालुक्यातून सुरेश फोगल कटरे, जि.प. वरिष्ट प्राथमिक शाळा पिपरटोला, सालेकसा तालुक्यातून राधेश्याम गेंदलाल टेकाम, जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा पांढरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून अशोक श्रावण नाकाडे, मुख्याध्यापक जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा चान्ना-बाक्टी, सडक-अर्जुनी तालुक्यातून उत्तम केवळराम बन्सोड, जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा धानोरी, गोरेगाव तालुक्यातून हरिराम केशव येळणे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा जानाटोला तर सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार आमगाव तालुक्यातील पुष्पलता लोकचंद क्षीरसागर, जि.प. प्राथमिक शाळा ढिवरटोला यांना देण्यात आला.माध्यमिक विभागातून सालेकसा तालुक्यातून जि.प. हायस्कूल कावराबांध येथील भुवनेश्‍वर बंडूजी सुलाखे तर सडक-अर्जुनी तालुक्यातून जि.प. हायस्कूल सडक-अर्जुनी येथील दुधराम पांडुरंग डोंगरवार यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत