Home शैक्षणिक शहारवानी शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शहारवानी शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

0

गोरेगाव,दि. २६ :  तालुक्यातील  शहारवानी येथील स्व.ब्रिजलाल कटरे हायस्कूल येथील इयत्ता १०वी विद्यार्थ्याना इयत्ता ९ व 8 वी च्या विद्यार्थ्या कडून निरोप देण्यात आला.या निरोप  समारंभ कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. दिप्तीताई पटले होत्या. यावेळी तमुस अध्यक्ष सुरेशकुमार नेवारे,शाळेचे मुख्याध्यापक आर. वाय. कटरे, सामाजिक कार्यकर्ता  राजेश पटले उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात शारदा मातेची व सावित्रीबाई फूले यांच्या प्रतीमेची पुजाअर्चना करुन करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. आलेल्या प्रमुख पाहुण्यानी १० वी च्या विद्यार्थीनां मार्गदर्शन करीत पुढच्य़ा वाढचालीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला  टेभंरे, यादव,बडोले,कु.ठाकरे,आर.एस.बिसेन ,सी. के.कटरे,बी. टी.चौधरी,एल. आर. दुधबर्वे, चव्हान बाई यांनी सहकार्य केले.

Exit mobile version