Home शैक्षणिक प्रा. शशिबाला झरने आचार्य पदवीने सम्मानित

प्रा. शशिबाला झरने आचार्य पदवीने सम्मानित

0
देवरी,दि.18ः- तालुक्यातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान व कला महाविद्यालय सुरतोली/लोहारा येथील प्रा.डॉ. शशिबाला झरने यांना छत्तीसगढ़च्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे हस्ते आचार्य पदवी बहाल करून सम्मानित करण्यात आले.प. रविशंकर शुक्ल विश्वविद्यालयाच्या 24 व्या दिक्षांत समारंभ प. दिनदयाल उपाध्याय आडोटोरियम रायपूर येथे नुकतेच पार पडले.यावेळी प्रमुख अतिथि म्हणुन राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महात्मा गांधीचे नातू गोपालकृष्ण गांधी, कुलपति प्रो. केसरीलाल वर्मा, कुलपति प्रो. निशिकांत पांडे उपस्थित होते.
  आचार्य प्रा.शशिबाला झरने यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरुजनानासह मार्गदर्शक प्राचार्य डॉ. संगीता घई, डागा महाविद्यालय रायपुर, सहशोध निर्देशक डॉ. अजय चंद्राकर  दुर्गा महाविद्यालय रायपुर,    जनता बहुउद्देशीय संस्था धोबिसराडचे संस्थापक राजकुमार मडामें, विनोद पनपालिया, ईश्वर झरने, यांना दिले आहे.छत्तीसगढ़ राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल याच्या हस्ते प्रा.शशीबाला झरने आचार्य पदवी ने सम्मनित झाल्याबद्दल प्रा.किशोर मेंढे, प्रा.सुयोग गजभिये, प्रा.आशा धुर्वे, प्रा. राहुल तiगड़े, प्रा.मनिषा तागड़े, प्रा.प्रभाकर भेसारे, प्रा. दिनेश शर्मा, डॉ. श्यामसुंदर राठी, शांतादेवी पनपालिया, पुरुषोतम पनपालिया, सुरेश चांडक, आकाश चांडक, संजय राणे, कुलदीप मiहुरकर,  आस्तिक परिहार, जानवी खोटेले, हंसराज भोडे, उमेश बावनथड़े, मुन्ना उके, आणि माहेश्वरी मण्डलच्या वतीने अभिनन्दन करण्यात आले.

Exit mobile version