गोंदिया,दि.05 : राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन १३ मार्च रोजी फुटबॉल मैदान नागोठाणे जि. रायगड येथे होणार आहे. या अधिवेशानात जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्या मांडण्यात येणार आहेत. या अधिवेशनात हजारो शिक्षक सहभागी होणार आहेत.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जूनी पेंशन योजना लागू करावी, २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करुन सर्वसमावेश नवीन बदली धोरण तयार करावे. नगरपालिका व महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनाकरीता राज्य शासनाने १०० टक्के अनुदान द्यावे, वस्ती शाळेतून शिक्षकाचा दर्जा प्राप्त निर्देशकांची सेवा जेष्ठतेसाठी मुळ नेमणूक तारीख ग्राह्य धरण्यात यावी. प्राथमिक शिक्षकाची मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी. संगणक प्रशिक्षण मुदत वाढ देऊन सेनानिवृत्त शिक्षकांची झालेली वसूली परत करण्यात यावी.शिक्षकांकरीता कॅशलेस वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करावी. शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्यात यावे, शिक्षण सेवक (कंत्राटी) पध्दत बंद करण्यात यावी, प्राथमिक शाळेतील सर्व १०० टक्के विद्यार्थ्यांना गणेवश देण्यात यावे, केंद्रप्रमुखाची रिक्त पदे ५० टक्के सेवाजेष्ठता व ५० टक्के पदविधर शिक्षकांच्या स्पर्धा परीक्षा घेऊन भरण्यात यावी. सातव्या वेतन आयोगातील त्रुटीचे निराकरण करून खंड २ प्रकाशित करण्यात यावा, नगरपालिका, महानगरपालिका शिक्षकांनी सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करावा, राज्यस्तरीय रोष्टर तयार करुन आंतरजिल्हा बदल्या करण्यात याव्या, इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आशवासीत प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्यात यावी, १४ व १५ व्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी सक्षमपणे प्राथमिक शाळा व अंगणवाड्याकरीता खर्च करण्यात यावा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांप्रमाणे प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना पदव्यूत्तर शिक्षणाकरीता फी सवलत मिळावी, पदवीधर वेतनश्रणी देताना एक अतिरीक्त वेतनवाढ देण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांना रजा रोखी करण्याचा लाभ देण्यात यावा, वरील सर्वविषयाची सोडवणुक करण्याकरीता राज्यातील लाखोच्या संस्थेने शिक्षक उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील नगरपालिका महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक व जिल्हा परिषद शिक्षकांनी अधिवेशनाकरीता आपल्या केंद्रातील संघाचे कार्यकर्ते यांचेशी संपर्क साधून अधिवेशनाकरीता आपली नोंदणी करावी असे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, यु.पी.पारधी,नुतन बांगरे, हेमंत पटले, सुधीर बाजपेयी, नागसेन भालेराव, केदार गोटेफोडे यांनी कळविले आहे.