न.मा.द. महाविद्यालयात अभिप्रेरणा सेमीनारचे आयोजन

0
94

गोंदिया,दि.05ः- गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात संस्थेचे सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात व महाविद्यालयाची प्राचार्या डॉ. रजनी चतुर्वेदी यांच्या अध्यक्षतेखाली आय.्नयू.ए.सी. आणि कॅरियर कॉन्सील सेल द्वारा एक दिवसीय सेमिनारचे आयोजन महाविद्यालयातील ऑडीटोरियममध्ये करण्यात आले. सेमिनारचे प्रमुख व्नता सुप्रसिद्ध उद्योजक महाबळेश्वर येथील सन राईज कॅण्डल कंपनीचे संस्थापक डॉ.भावेस भाटीया हे होते. डॉ.भावेस भाटीया यांनी महाविद्यालयातील विद्याथ्र्यांना शिक्षण घेतांनाच आपल्या मधील उद्योजक वृत्ती जागृत करावी. छोट्या-छोट्या आवश्यकतावरून उद्योगाची निर्मिती करावी कोणतेही कार्य करतांना ते प्रामाणिपणे जिद्दीने व त्यात नियमितता असावी. भविष्यात यशस्वी होण्यासाठी जवळचे मित्र असावे व पुस्तकांची मित्रता करावी अशा अनेक विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलचे संयोजक डॉ.भावेस जसानी यांनी डॉ.भावेस भाटीया यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली. डॉ.सफीउल्ला खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार बि.कॉम अंतीम वर्षाची विद्यार्थींनी पूजा पासवान, पूजा जसवानी, दिव्यांनी लिल्हारे यांनी केले व कार्यक्रमाचे संयोजन कार्तिक हरिणखेडे, दिपक प्रजापती, अनिरूद्ध हरिणखेडे व कमलेश चिखलोंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठयासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राकेश खंडेलवाल, डॉ.रqवद्र मोहतूरे, डॉ.मुनेश ठाकरे, डॉ. खुशबू होतचंदानी, डॉ. शशीकांत चौरे, डॉ.गिरीश कुदळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले.