
गोंदिया,दि.06ः-येथील श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाच्या वतीने तीन दिवसीय ‘रंगतरंग’ चित्रकला प्रदर्शनीचे आयोजन ६ मार्चपासून प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयात करण्यात आले आहे. यंदा खैरागड विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे चित्रकलेचे प्रात्याक्षिक आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.
चित्रकला, शिल्पकला, मूर्तीकला, काष्ठकला आदी कलेच्या ज्ञानदानासोबतच या कलांची जनजागृती व्हावी, या उद्देशाने गत १0 वषार्पासून प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाद्वारे वषार्तून एकदा महाविद्यालयात तसेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलेचे प्रदर्शनी लावली जाते. त्याला नागरिकांचाही उत्स्फरूत प्रतिसाद मिळतो. यंदा हे प्रदर्शन ६ ते ८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले असून सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजतापयर्ंत नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. यंदा छत्तीसगड राज्यातील खैरागड कला संगीत विश्वविद्यालयाच्या बीएफए अंतिम वर्षाचे विद्यार्थी आपल्या कलेचे प्रात्याक्षिकासह प्रदर्शन करणात आहेत.
यात पंकज यादव हे ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता पेटींगचे, विशाल ढेका हे पोट्र्रेट व विजय कटरे हे सकाळी १0 वाजता शिल्पकलेचे प्रात्याक्षिक करुन दाखविणार आहेत. या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार व प्राचार्य अभय गुरव यांनी केले आहे.