गोंडवाना विद्यापीठ २७ मार्चपर्यंत बंद

0
63

गडचिरोली,दि..२३: कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी देशभर प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ परिसर २७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विद्यापीठ परिसरातील वसतिगृहे व कार्यालयांमध्ये होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक व तातडीची उपाययोजना म्हणून कुलगुरुंनी हे निर्देश दिले आहेत. तथापि, कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव, वित्त व लेखा विभाग, परीक्षा व मूल्यमापन विभाग, संगणक, आवक-जावक विभागातील अधिकारी व एक कर्मचारी हे कार्यालयात राहतील, असेही कुलगुरु डॉ.कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे.