गावपातळीवरील संस्थागत क्वारंटाईन केंद्रावर शिक्षकांचे नियंत्रण

0
951

गोंदिया,दि.22 : कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मंगळवारला पुन्हा दोन करोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने स्थलातंरीत मजुरांची संख्या बघता तातडीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला संस्थागत क्वारंटाईन सेंटर करुन परराज्यातून व परजिल्ह्यातून आलेल्यांना शाळेत क्वारंटाईन करण्यास सुरवात झाली आहे.यामध्ये महिला व मुलांना फक्त होमक्वारंटाईन ठेवण्यात येणार असून यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबधित गावातील शाळेच्या शिक्षकांना 3 पाळीमध्ये 8-8 तास कार्यरत राहावे लागणार आहे.आजपर्यंत करोना संसर्गाच्या लढ्यात आरोग्य,ग्रामसेवक,तलाठी व पोलीस कर्मचारीच कार्यरत होते.आता यात शिक्षकांचीही सेवा जोडली गेली आहे.

यासंदर्भात जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी मंगळवारी एक पत्रक काढून परजिल्हा व परराज्यासह रेड झोनमधून येणाºया नागरिकांना गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहे.सध्या सर्वत्र कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढ आहे. त्यातच मागील ३९ दिवसांपासून कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांपासून कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी गावात बाहेरुन येणाºया नागरिकांना गावातील जि.प.व खासगी शाळा, वसतिगृृह इमारतींमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्याची व्यवस्था करण्यास सुरवात झाली आहे.
क्वारंटाईन कक्षाच्या ठिकाणी वीज,पाणी, आंघोळीकरिता लागणारे पाणी, शौचालयाची व्यवस्था असेल अशा इमारतीची निवड करावी. तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांनाच्या जेवणाची व राहण्याकरिता लागणाºया साहित्याची व्यवस्था ही कुटुंबातील व्यक्ती करतील असे निर्देश दिले आहे.सोबतच आरोग्य कर्मचारी,आशासेविका,अंगणवाडी सेविकांना दररोज त्यांची आरोग्य तपासणीकडे लक्ष द्यावयाचे आहे.गाव स्तरावर स्थापन झालेल्या क्वारंटाईन कक्षासह परिसरातील स्वच्छतेसह इतर सर्व सुविधा व्यवस्थित आहेत किंवा नाही,तसेच नेमलेले शिक्षक असतात की नाही या सर्वाकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांना दिले आहेत.