Home रोजगार स्वतः मध्ये कौशल्य तयार करा : राहुल कोसराबे

स्वतः मध्ये कौशल्य तयार करा : राहुल कोसराबे

0
पवनी : संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) पवनी आणि युवाशक्ती संघटना पवनी तसेच डोन्ट वरी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने “युवाशक्ती” व्याख्यानमाला सुरू केली आहे या व्याख्यानमाला चे दुसरे सत्र दिनांक २९ जानेवारी २०२४ रोज सोमवार ला “आय टी आय च्या विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधी” या विषयावर राहुल कोसराबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
 यावेळी कार्यक्रमाचे वक्ते युवा उद्योजक तसेच कालका इंटरप्राईजेस चे मालक राहुल कोसराबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यापारी संघाचे अध्यक्ष तसेच युवाशक्ती ग्रूप चे संस्थापक/अध्यक्ष देवराज बावनकर, प्रमूख उपस्थीती डोन्ट वरी ग्रुप चे निशांत नंदनवार, प्रमूख उपस्थीती संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी चे प्राचार्य योगेश बावनकर उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश बावनकर यांनी “युवाशक्ती” व्याख्यानमाला ची संकलपना सांगितलं त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराज बावनकर यांनी युवाशक्ती संघटना पवनी च्या माध्यमातून आम्ही मोफत सैन्य प्रशिक्षण देऊन ३०० पेक्षा अधिक युवकांना रोजगाराला लावले आहे व आता संत जगनाडे महाराज आय टी आय पवनी च्या माध्यमातून युवकांना रोजगार व स्वयंरोजगार करिता लावून देत असतो व त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करीत आहोत असे सांगितले त्यानंतर कार्यक्रमाचे वक्ते राहुल कोसराबे यांनी सांगितले की कौशल्य असेल तर रोजगार पाहिजे तेव्हा भेटू शकते  मी स्वतः आता पेपर कप व तसेच अगरबत्ती चे व्यवसाय करतोय माझ्यात कौशल्य आहे म्हणून मी हे काम करू शकतो आहे. व्यवसायाचे नियम आहे १ ला वर्ष खुप चालते त्यांनतर २ रा वर्ष काम नाही राहत आणि ३ रा वर्ष काम बंद करून देऊ असं विचार येते यात तुम्ही टिकून राहल तर तुम्ही व्यवसाय करू शकतो अन्यथा करू नका असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकित देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन आदित्य रामटेके यांनी केले.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी चे निर्देशक मिलींद बोरकर, स्वप्नील वंजारी, प्रणय थोटे, रसिका धुर्वे, उज्वला सोराखे यांनी केले.

Exit mobile version