Home Featured News कालिदास महोत्सव दरम्यान ‘प्रेस फोटोग्राफर्स’चे छायाचित्र प्रदर्शन

कालिदास महोत्सव दरम्यान ‘प्रेस फोटोग्राफर्स’चे छायाचित्र प्रदर्शन

0

नागपूर, दि. ८- कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ व कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास महोत्सव २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने पूर्व विदर्भातील विविध पर्यटन स्थळ व ऐतिहासिक वास्तुंची माहिती लोकांना व्हावी यादृष्टीने नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असो. च्या सहकार्याने छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

पूर्व विदर्भातील वन्यजीव, जंगल, ऐतिहासिक वास्तू – स्थळे, पर्यटन स्थळ याविषयावरील हौशी तसेच व्यावसायिक छायाचित्रकारांनी छायाचित्र पाठवून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. छायाचित्र १२ इंच १८ इंच या आकारातील हाय रिझॉल्युशनवर kalidas.nppa@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे. १५ नोव्हेंबर अंतिम तारीख असून उत्तम व निवडक छायाचित्रांचा समावेश प्रदर्शनीत केल्या जाईल. छायाचित्रा सोबतच त्या विषयीची माहिती थोडक्यात द्यावी.

प्रदर्शनी २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात राहिल. याबाबत सविस्तर माहितीसाठी अनंत मुळे- ९८८१७१७८४१,  राजेश टिकले- ९९२२९१४९९१, अनिरुद्धसिंह दिनोरे-  ९९२२११२३५९, राकेश वाटेकर- ९८२२३६१२२१, धनंजय खेडकर- ७३८५५८५७९९ आणि संदीप सोनी- ९९२२९३०१६८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version