Home Featured News फोटोशूट कॉम्पीटिशन छायाचित्रकारांची उपस्थिती;आज पोस्टर्स स्पर्धा

फोटोशूट कॉम्पीटिशन छायाचित्रकारांची उपस्थिती;आज पोस्टर्स स्पर्धा

0

 

गोंदिया, दि. ८ : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी तेथील निसर्गसंपदा व वन्यजीवांना कॅमेरात टिपण्यासाठी सारस महोत्सवादरम्यान १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत फोटोशूट कॉम्पीटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र यासह दिल्ली येथील महिला छायाचित्रकार मारीया शर्मा यांच्यासह देशातील ४० छायाचित्रकारांनी आपली उपस्थिती दर्शवून स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ९ जानेवारी सुभाष गार्डन येथे पोस्टर्स स्पर्धेचे, भित्ती चित्रकला स्पर्धा केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथील भिंतीवर १० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

Exit mobile version