Home Featured News ‘नवरगाव नॅशनल आर्ट फेस्टिवल’ला सुरवात

‘नवरगाव नॅशनल आर्ट फेस्टिवल’ला सुरवात

0

चंद्रपूर,दि.९–जिल्ह्याचं सांस्कृतिक वैभव असलेल्या “नवरगाव नॅशनल आर्ट फेस्टिवल” ला आज पासून नवरगाव येथील ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयात सुरुवात झाली. तीन दिवसाच्या या रंगरेषा महोत्सवात देशभरातील १९० नामांकित चित्रकार आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. अतिशय भव्य स्वरुपात होणा-या या महोत्सवाने असंख्य लोकांना या कला कलेकडे आकर्षित केले आहे.

चित्रकलेच्या प्रांतात आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील छोटंसं गाव म्हणजे ‘नवरगाव’  हा फेस्टिवल म्हणजे देशातील प्रतिथयश चित्रकार आणि कलेच्या प्रांतात आपलं पाऊल घट्ट करू पाहणा-या विद्यार्थ्यांना एकत्र आणणारा महोत्सव. देशभरातील ३० नामांकित चित्रकार आणि १६० विद्यार्थी कलेच्या प्रांतातील आपली मुशाफिरी दर्शविण्यासाठी नवरगावात दाखल झाले आहेत. अगदी कोलकात्याच्या शांतीनिकेतन पासून ते मुंबईच्या जे.जे. आर्ट कॉलेजचे विद्यार्थी इथे आपल्या आवडीची रंग माध्यमे वापरून कला सादर करत आहेत. लंॅडस्केप, पोट्रेट्स , कंपोझिशन, अध्यात्म, सामाजिक संदेश असे एक ना अनेक विषय चित्रकलेच्या माध्यमातून चितारले जात आहेत. नवरगाव येथे भरलेल्या कलाकारांच्या या मांदीयाळीत ३० ज्येष्ठ चित्रकारांनीही हजेरी लावली आहे

Exit mobile version