Home Featured News हजारो भाविकांनी घेतला भजनाचा लाभ

हजारो भाविकांनी घेतला भजनाचा लाभ

0

गोंदिया  दि. २१: : मनोहरभाई पटेल अँकेडमीतर्फे शहराच्या नमाद महाविद्यालयात आयोजित विनोद अग्रवाल यांच्या भजनसंध्येचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. कृष्ण भक्तीवर त्यांनी भजने सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरूवात माता शारदा देवी व शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राचे पूजन करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली.विनोद अग्रवाल यांच्या सोबत यांचे सहकारी बलदेव भय्या, राधेराधे हे मंत्रजाप केले. भजनाच्या माध्यमातून श्री कृष्णाची बालक्रिडा, रासलीला यांचे वर्णन करण्यात आले.भजनात महिला व तरूणी नाचल्या. प्रास्ताविक करताना आ. राजेंद्र जैन म्हणाले खा. प्रफुल पटेल व मनोहरभाई पटेल एकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या प्रेरणेतून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडासंबंधी उपक्रम घेतले जात आहेत. विनोद अग्रवाल यांनी ‘आजा आजा रे कन्हाई, मेरी लगी श्याम संग प्रीत,’ असे विविध भजन सादर केले.

Exit mobile version