Home Featured News सोनालीला उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार

सोनालीला उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार

0

गोंदिया : एनएमडी महाविद्यालयास विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यापीठस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दीक्षांत सभागृहात सोमवारी पार पडला. यात सोनाली उमरे हिला ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार २0१४-१५ ने सन्मानचिन्ह, ग्रामगीता व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, प्र कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, विद्यापीठाचे रासेयो समन्वयक डॉ. भाऊ दायदार, विभागीय समन्वयक डॉ. बबन मेश्राम उपस्थित होते. रासेयो विद्यापीठस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष वर्षा पटेल, सचिव आ. राजेंद्र जैन, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्ह्यातील रासेयो कार्यक्रम अधिकारी व रासेयो स्वयंसेवकांनी कौतुक केले.

Exit mobile version