Home Featured News छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात आदरांजली

छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात आदरांजली

0


 मुंबई, दि. 6 : सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती  शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली
वाहिली.  याप्रसंगी विधानसभेचे माजी सदस्य मधु चव्हाण, विधानमंडळ  सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव यू.के.चव्हाण, सहसचिव अशोक मोहिते, सहसचिव तथा सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, उपसचिव शिवदर्शन साठ्ये, अवर सचिव उमेश शिंदे, सुनिल झोरे, रंगनाथ खैरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Exit mobile version