Home Featured News ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेचं निधन

0

मुंबई, दि. 04 – ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन झालं आहे. वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या. सुलभा देशपांडे यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटामध्येदेखील आपल्या अभिनयाने छाप उमटवली होती. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रविवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Exit mobile version