Home Featured News मूल येथे आढळले खवल्या मांजर

मूल येथे आढळले खवल्या मांजर

0

चंद्रपूर, दि. १२ -मूल येथिल नगरसेवक बाबा अझिम यांच्या घराशेजारी एका पडक्या घरी दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आले. ही माहीती अझीम यांनी मूल येथील प्राणीमित्र उमेशसिंह झिरे यांना दिली. झिरे यांनी लगेच त्या स्थळी जाऊन खवल्या मांजरला ताब्यात घेतले व ही माहिती वनविभागाला दिली. खवल्या मांजर आढळल्याची ही दुसरी घटना मूल तालुक्यात दोन दिवसात घडली.

या आधी मूल तालुक्यातील बेंबाळ येथील गड्डमवार यांच्या घरी दुर्मिळ खवल्या मांजर आढळुन आले होते.

Exit mobile version