Home Featured News चुरडी येथे नोव्हेंबर २०१७ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य समेंलनाचे आयोजन

चुरडी येथे नोव्हेंबर २०१७ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य समेंलनाचे आयोजन

0

तिरोडा,दि.१८- श्री गुरूदेव मंडळ, चुरडीच्यावतीने येत्या नोव्हेंबर २०१७ मध्ये वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय मंडळाच्या बैठकित सर्वानुमते घेण्यात आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या समग्र साहित्यातून मानवाला त्यांच्या हिताकरीता उपयुक्त असा संदेश देण्याचे कार्य केले आहे.मानवासमोर असलेल्या सर्व समस्यांचे निराकरण त्यात आहे. या करीता राष्ट्रसंतांच्या विचाराची खरी गरज आजच्या समाजाला आहे.ते विचार व साहित्याचा प्रसार व प्रचार अधिकाधिक व्हावा या उद्देशाने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
या बैठकीला तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले,आचार्य हरीभाऊ वेरूळकर,अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळांचे प्रचारक,साहित्यिक व चित्रकार प्रदिप पवार,ज्ञानेश्वर रक्षक,नितीन शिराळकर,मिल्कीराम डहारे,श्री गुरूदेव सेवा मंडळ चुरडीचे कार्यवाह मनोहर शेंडे,श्री गुरूदेव सेवा मंडळ चुरडीसह गोंदिया जिल्हातील सर्व पदाधिकारी ग्रामगीताचार्य व कार्यकर्ता बैठकीला उपस्थित होते.समेलनाच्या आयोजनाची जबाबदारी आमदार विजय रहागंडाले यांनी स्विकारली असून समेलनात महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनीना अधिक सहभागी करुन घेण्यावर भर देण्याचे ठरले.

Exit mobile version