Home Featured News जेसीआई राईस सिटीच्यावतीने मुन्सिपल कान्वेंटला सुजल भेट

जेसीआई राईस सिटीच्यावतीने मुन्सिपल कान्वेंटला सुजल भेट

0

गोंदिया,दि.19:- जेसीआई गोंदिया राईस सिटीच्यावतीने १५ आॅगस्ट येथील नगरपरिषद मुन्सिपल कान्वेंटला सुजल (पाणी आरो ) भेट देण्यात आला.जेसीआई २०१७ चे अंतराष्ट्रीय अध्यक्ष जेसी राजकुमार मेनन यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक विभागाने एक तरी सुजल (पाणी आरो) गरजूना भेट देण्याचे ठरविण्यात आले आहे.त्यानुसार जेसीआई गोंदिया राईस सिटीच्या पदाधिका-यांनी येथील नगरपरिषद मुन्सिपल कान्वेंटला सुजल (पाणी आरो ) भेट देण्याचे निश्चित केले.त्यानुसार नगरपरिषद शिक्षण सभापती भावनाताई कदम यांच्या हस्ते सुजलचे उदघाटन करण्यात आले.यावेळी जेसीआई गोंदिया राईस सिटीचे अध्यक्ष जेसी ओमप्रकाश सपाटे, सौरभ जैन, अंकुश डोडानी, शैलेंद्र कावळे, मधुलिका नागपुरे, स्वाती चव्हाण, मयूर कांबळे, राम लालवानी, सेजल पटेल, अंजली कोशिक, शकील तुरक व जेसीआई चे इतर सदस्य तसेच शाळेतील मुख्याध्यापक गैरवार मैडम, शाळेतील शिक्षका अंशारी मैडम व शाळेतील इतर शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version