
नवी दिल्ली – सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जीवनरक्षा पदकांची रविवारी घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून २०१४ च्या ५६ जणांच्या यादीला मंजुरी देण्यात आली. त्यात सर्वोत्तम जीवनरक्षा ४, उत्तम जीवनरक्षा पदक १७, जीवनरक्षा पदक ३५ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे शशिकांत रमेश पवार, गणेश अहिरराव यांना उत्तम जीवनरक्षा पदक, तर जितेश मधुकर काळे, भूषण शांताराम संख्ये यांना जीवनरक्षा पदक जाहीर झाले.
सर्वोत्तम जीवनरक्षा पदक : जयेंद्र प्रसाद (मरणोत्तर, उत्तराखंड), बलराम कुमार (मरणोत्तर, झारखंड), नित्यानंद गुप्ता (मरणोत्तर, उत्तर प्रदेश), मास्टर आर्यन राज शुक्ला (मरणोत्तर, उत्तर प्रदेश).
उत्तम जीवनरक्षा पदक : मास्टर मेसक रेमनालांगाका (मरणोत्तर, मिझोराम), नंदराम (मरणोत्तर उत्तराखंड), बिभूती रॉय (मरणोत्तर, आसाम), सर्वेशकुमार (मरणोत्तर, उत्तर प्रदेश), जेमॉन पीजी (मरणोत्तर केरळ), अजय लाल (मरणोत्तर, उत्तराखंड), भीमसिंग (मरणोत्तर, जम्मू-काश्मीर), सतीशकुमार (मरणोत्तर, हरियाणा), के. विनायगन (मरणोत्तर, आंध्र प्रदेश), बसवराज यारागट्टी (मरणोत्तर, कर्नाटक), संतोषकुमार पासवान (मरणोत्तर, झारखंड), संजीवकुमार (मरणोत्तर, उत्तर प्रदेश), शशिकांत रमेश पवार (मरणोत्तर, महाराष्ट्र), गणेश अहिरराव (मरणोत्तर, महाराष्ट्र), एल. मानिओ चाचेई (मरणोत्तर, नागालँड), इमरान खान (मरणोत्तर, उत्तर प्रदेश), अनुपसिंग ठाकूर (मध्य प्रदेश).
जीवनरक्षा पदक : अमरसिंग कुरे (छत्तीसगड), जेशान मेमॉन (छत्तीसगड), विवेककुमार (जम्मू-काश्मीर) गुलाम नबी भट (जम्मू -काश्मीर), मेहराज-उद-दिन भट (जम्मू-काश्मीर), के.सी. मॅथ्यू (केरळ), अब्दुल हनिफ (मध्य प्रदेश), जितेश मधुकर काळे (महाराष्ट्र), जेरोम दोहमिंग्थांगा (मिझोराम), लालनुन्माविया (मिझोराम), मास्टर अभिषेक सिंग (राजस्थान) अब्दुल हमीद (अंदमान -निकोबार), एस.एम. कुमारस्वामी (मरणोत्तर, कर्नाटक), विजयकुमार सिंग (मरणोत्तर, दिल्ली), शाजू पीपी (केरळ), के.आर. संतोषकुमार (तामिळनाडू), भूषण शांताराम संख्ये (महाराष्ट्र).