Home Featured News ओबीसी विद्यार्थी, युवक-युवती महाअधिवेशन नागपुरात २० डिसेंबरला

ओबीसी विद्यार्थी, युवक-युवती महाअधिवेशन नागपुरात २० डिसेंबरला

0

चंद्रपूर,दि.8 : ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक, युवतींना एकत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरात २० डिसेंबरला ओबीसी विद्यार्थी,विद्यार्थिनी, युवक, युवती महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे़ भाऊसाहेब डॉ़ पंजाबराव देशमुख सभागृह कॉंग्रेस भवन येथे महाअधिवेशन होणार असून, ओबीसींच्या विविध समस्या, मागण्या आणि विषयांवर या महाअधिवेशनात विचारमंथन होणार आहे़

जलसंधारण मंत्री प्रा़ राम शिंदे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार असून, पूजा मानमोडे स्वागताध्यक्ष असणार आहेत़ माजी खासदार तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ़ खुशालचंद्र बोपचे अध्यक्षस्थानी असतील़ यावेळी राष्ट्रीय ओबीस महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा़ डॉ़ बबनराव तायवाडे, ज्येष्ठ विचारवंत गणेश हलकारे हे प्रमुख वक्ते आहेत़ नव्या जगाची ओळख या विषयावर ते मत मांडतील़ तर, माणिकराव ठाकरे, चंद्रशेखर बावणकुळे, एकनाथराव खडसे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बळीराम सिरसकर, सुनील केदार, आशिष देशमुख, रवी राणा, डॉ़ परिणय फुके, सेवक वाघाये, डॉ़ अविनाश वारजुकर,प्राचार्य अशोक जीवतोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे़.
द्वितीय सत्रात समारोप होणार आहे़ समारोपाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर राहणार आहेत़ यावेळी बबलू कटरे हे एकविसाव्या शतकातील ओबीसी विद्यार्थी व युवकांसमोरील आव्हाने, प्रा़ शेषराव येलेकर हे भारत सरकार शिष्यवृत्ती व महाराष्ट्र सरकारची प्रतिपूर्ती योजना, आणि मेघा सुरेश रामगुंडे या ओबीसी चळवळीत विद्यार्थी, विद्यार्थिनी व युवकांचा सहभाग या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत़ यावेळी आमदार डॉ़ संजय कुटे, आमदार सुधाकर कोहळे, चंद्रपूर जि़प़अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमोद मानमोडे, दिनेश दादापाटील चोखारे, , माधव कांबळे, ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित राहणार आहे़ एक दिवसीय महाअधिवेशनाला प्रविण चवरे,रवींद्र टोंगे,निलेश चालुरकर,दिपक पिंपळशेंडे,आकाश चालुरकर,संजय देवाळकर,दिनेश पिंपळशेंडे,प्रकाश चालुरकर,ईश्वर आवरी,अमित टोंगे,श्रीकृष्ण देवाळकर,प्रविण नागपुरे,राजकुमार नागपुरे,सुनील मुसळे,विलास देवाळकर, समीर कोंडेकर,राकेश पिंपळकर,निकिलेश चामरे,स्वाती चामरे,प्रीती जुनघरे,शुभांगी भिवणकर,अपूर्वा भटारकर,मनीषा निब्रड,अश्विनी मोहितकर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़.

Exit mobile version