Home Featured News डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन…

डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन…

0

नागपूर,दि.27:- शिक्षणमहर्षि आणि देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंती ‍निमित्त नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विपक्ष नेता तानाजी वनवे व धरमपेठ झोनच्या सभापती रुपा राय यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठा समोरील स्व. भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेवक सर्वश्री सुनिल हिरणवार,. किशोर  जिचकार,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष व धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, दिलीप मोहितकर, अजय तायवाडे, पंजाबराव कृषी विदयापीठ व शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या तैलचित्राला उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

Exit mobile version