Home Featured News ब्लॉसमच्या रिव्यानीने जगाला सोडून जातांना दिला अवयव दानाचा संदेश

ब्लॉसमच्या रिव्यानीने जगाला सोडून जातांना दिला अवयव दानाचा संदेश

0

चिमुकलीच्या अवयव दानाचा निर्णय घेऊन समाजाला एक नवीन संदेश

देवरी,( सुजित टेटे )दि.२७- ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे केजी-२ वर्गामध्ये शिकत असलेल्या रिव्यानी (५ वर्षे )राधेश्याम रहांगडाले हि मुलगी शालेय परीक्षा संपल्यावर आपल्या  कुटुंबासोबत उन्हाळी सुट्ट्या आनंदाने घालवत होती. मामासोबत दुचाकी वरून प्रवास  करत असतांना एक मद्यधुंद व्यक्तीने समोरा समोर दुचाकीला धडक दिली असता या मुलीचा १९ एप्रिल ला दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि तिला नागपूर येथे हलविण्यात आले. चिमुकली रिव्यानी ७ दिवसापासून मृत्यूशी झुंज देत असतांना आज तिला मृत घोषित करण्यात आले. तिचे बाबा पोलीस विभागात कार्यरत असून आई गृहिणी आहे . सदर बातमी देवरी येथे पसरताच सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.रिव्यानीचे अंतिम संस्कार दिनांक २८/०४/२०१८ ला त्यांचे मूळ गाव भजीयापार ( आमगाव रेल्वे क्रॉसिंग) येथे पार पडणार आहे.

जाताजाता मुलीच्या अवयव दाना मुळे कुणाला तरी जग बघता येणार या दूरदृष्टीने आई वडील आणि समस्त कुटुंबाने तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला असून तिचे ५ अवयव – हृदय , डोळे , लिव्हर ,किडनी इत्यादी अवयव आज नागपूर येथे दान करण्यात आल्याची माहिती वडील राधेश्याम रहांगडाले यांनी दिली. चिमुकली जग सोडून गेली पालकांना  दुःखाचे डोंगर असतांना देखील सदर अवयव दानाचा निर्णय घेऊन समाजाला एक नवीन संदेश या चिमुकलीने आणि कुटुंबाने दिलेला आहे. शाळेत अत्यंत हुशार आणि सदा हसमुख  रिव्यानी नर्सरी वर्ग पासून देवरी येथील ब्लॉसम शाळेत शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे या वर्षी पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये तिने सर्वांना अवयव दानाचा संदेश दिलेला होता. सर्व पालक वर्ग, विध्यार्थी , शिक्षक , मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापनांनी आपापल्या स्तरावरून श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version