Home Featured News प्लॅटफॉर्म तिकीट आता 5 ऐवजी 10 रुपयांना

प्लॅटफॉर्म तिकीट आता 5 ऐवजी 10 रुपयांना

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरात दुप्पट वाढ करत, एक एप्रिलपासून रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पाच ऐवजी दहा रुपयांना मिळणार आहे. याचबरोबर 1 एप्रिलपासून प्रवासी 60 दिवसांऐवजी 120 दिवस आधी रेल्वेचे आरक्षण करू शकणार आहे.

राज्यसभेत मंगळवारी आवाजी मतदानाने रेल्वे अर्थसंकल्प मंजूर करून लोकसभेकडे परत पाठवण्यात आला आहे. रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट 1 एप्रिलपासून 5 रुपयांच्या ऐवजी 10 रुपये करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रॅली, यात्रा, उत्सव किंवा विशेष कार्यक्रमाच्यावेळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे व्यवस्थापकाला प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 रुपयांपेक्षा अधिक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. रॅली, यात्रा किंवा उत्सवादरम्यान प्लॅटफॉर्मवर अधिक गर्दी होते आणि त्याचा त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रकारचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे आरक्षण कालावधी वाढवण्यात आला असून 60 दिवसांऐवजी 120 दिवस अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे. यामुळे दलाली टाळण्यास मदत मिळणार असून प्रत्यक्ष प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत रेल्वेची सॉफ्टवेअर बदलण्यात येणार आहे. ‘रेल्वे खाजगीकरण होणार नाही. रेल्वे राष्ट्राची संपत्ती आहे‘‘ असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.

Exit mobile version