Home Featured News माजी मंत्री शिवणकरांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

माजी मंत्री शिवणकरांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

0

गोंदिया- भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री व ग्रामोत्थान व जनकल्याण संस्था आणि महाकाली सिध्दपिठ आमगावचे संस्थापक अध्यक्ष प्रा. महादेवरावजी शिवणकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी(ता.7)बनगाव येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीचे कार्यवाह न.था.फरांदे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हरिहरभाई पटेल, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले सोबतच माजी प्रार्चाय डॉ.के.एम. भांडारकर, डॉ. बुलाकीदास कलंत्री उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८.३० वाजेपासून हनुमानचालीसा पाठ तरुन सेवा मंडळ गोंदिङ्माच्ङ्मावतीने सादर करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता भव्ङ्म नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिङ्मा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दंत चिकित्सा शिबिर ही आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता महाकाली सिद्धपीठ आमगाव येथे दिप यज्ञ निमित्त १० हजार दिवे लावण्ङ्मात ङ्मेणार आहेत.

Exit mobile version