Home Featured News डॉ.लंजे,डॉ.चौधरी व डॉ.गंजेवारांच्या नेतृत्वात पेसमेकर शत्र्यक्रिया यशस्वी

डॉ.लंजे,डॉ.चौधरी व डॉ.गंजेवारांच्या नेतृत्वात पेसमेकर शत्र्यक्रिया यशस्वी

0

गोंदिया,दि.२२ः-येथील राणी अवतींबाई चौक स्थित सहयोग समुहाच्या सहयोग मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात ७० वर्षीय रुग्ण सुखलाल उके यांच्यावर यशस्वीरित्या जिल्ह्यातील पहिली पेसमेकर शत्र्यक्रिया यशस्वी करण्यात आली.ही शत्र्यक्रिया सर्जन डॉ.विवेक लंजे,कार्डियोलॉजिस्ट डॉ.दर्पण चौधरी व डॉ.शैलेंद्र गंजेवार यांच्या चमुने केली.उके यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या हृदयाची गती संथ व असामान्य असल्याचे आढळून आले.त्यांच्या हृदयाची गती वाढविण्यासाठी शस्त्रक्रिया करुन पेसमेकर या उपकरणाला हृदयात लावायचे होते.त्यासाठी रुग्णाच्या समंतीने शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले.यात रुग्णालयातील कॅथलॅब टेक्नीशियन,निवासी वैद्यकीय अधिकारी,नर्सिग स्टॉपने सहकार्य केले.

Exit mobile version